एक महत्वाचे पाऊल हवं बदलालकरीता महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्यांनी उचलेल आहे. महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री यांनी एक नवीन प्रकल्प समोर आणला आहे. एका महत्त्वपूर्ण उपक्रमामध्ये, महाराष्ट्र सरकारने C40 (सी-४०) सिटीज नेटवर्क या जागतिक हवामान बदलाशी निगडीत असलेल्या जागतिक हवामान नेटवर्कच्या मुंबई हवामान कृती योजनेअंतर्गत वूमन 4 क्लायमेट कार्यक्रम सुरू केला आहे. ज्याचे उद्दीष्ट सर्व रहिवाशांना एकत्रित आणून हवामान बदलकरीता लढा देणे आहे. या धोरणामुळे महिलांमधील नेतृत्व गुणांना वाव मिळेल तसेच पुढच्या पिढीला हवामान लढवैये तयार होतील.
C40 सिटीज नेटवर्क ज्ञान आणि अनुभव सामायिक करेल आणि शहरातील महिलांसाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी प्रदान करेल. Women4Climate, C40 Cities Network आणि L’Oréal Foundation यांचा संयुक्त उपक्रम, तत्त्वज्ञानाने प्रेरित आहे, स्थानिक पातळीवर विचार करते तसेच जागतिक पातळीवर कार्य करते. तसेच C40 शहरांतील महिला त्यांच्या हवामान प्रकल्पांना गती देण्यासाठी कृती विकसित आणि अंमलात आणू शकतात
राज्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले कि, “वर्ष 2020 मध्ये, जेव्हा हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एक मजबूत रोडमॅप विकसित करण्यासाठी मुंबई C40 सिटीज नेटवर्कमध्ये सामील झाली, तेव्हा आम्ही इतिहास रचला आणि आता महिलांना मुंबई हवामान कृती आराखड्यात अग्रस्थानी आणून, आम्हा सर्वांचे नेतृत्व करण्यासाठी व हवामान बदलांशी लढण्याच्या जागतिक प्रयत्नांमध्ये मोठे योगदान देण्यासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवतो . ”
क्लायमेट लीडर्स सिटी मेंटॉरशिप प्रोग्राम मधून निवडले जातील. या प्रोग्रॅम मधून त्यांना मार्गदर्शन केले जाईल. महिन्यातून त्यांचे वेबिनार्स घेतले जातील त्यात नवीन संकल्पना तसेच त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. महाराष्ट्र सरकारने मुंबईतील महिलांना या कार्यक्रम सामील होण्याचे आवाहन केले आहे.