उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ४० टक्के महिलांना तिकीट देणार असल्याची घोषणा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली त्यावरून राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. सुष्मिता देव, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासारख्या महिलांना काँग्रेस बाहेर पडण्यापासून थांबवू शकली नाही. “माझ्या सारख्या जुन्या महिला नेत्यांचा काँग्रेसमध्ये अपमान झाला”, अशी तीव्र प्रतिक्रिया उत्तर प्रदेशच्या भाजपच्या नेत्या रिता बहुगुणा जोशी यांनी व्यक्त केली आहे.
अनेक महिलांनी काँग्रेस पक्षाचा त्याग केला आहे. आमच्या यासारख्या अनेक महिला नेता आहे ज्यांचे तिथे राजकीय स्तरावर शोषण होते. अनेक ठिकाणी निवडणूक होतात पण किती महिलांना तिकीट मिळते? असे भाजप नेता रिता बहुगुणा जोशी यांनी म्हटले.
प्रियांका गांधी यांनी एक नवीन राजकीय ओळख म्हणून ४० टक्के महिलांना उमेदवारी देणार असल्याची घोषणा केली. काँग्रेसला यामुळे एक नवीन ऊर्जा मिळू शकेल, असा त्यांचा राजकीय होरा होता. परंतु उत्तर प्रदेशात काँग्रेसची राजकीय स्थिती आता अगदी तोळामासा झाली आहे. ४०३ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे फक्त्त आठ आमदार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. परंतु काँग्रेसमधुन बाहेर पडलेल्या रिता बहुगुणा यांनी या मुद्द्यावर काँग्रेसच्या हायकमांडवरच प्रश्न उपस्थित केला आहे.