नागपूर: स्त्री-पुरुष समानतेला चालना देणारे कायदे, धोरणे आणि कार्यक्रम विकसित करणे व त्याची अंमलबजावणी करणे हे केंद्र व राज्य सरकारची कर्तव्ये आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने पहिले महिला धोरण 1994, दूसरे महिला धोरण 2001, तीसरे महिला धोरण 2014 ला जाहिर झाले व चौथे महिला धोरण 8 मार्च 2022 ला येवू घातले आहे.
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रात सर्वांगीण विकास व राजनीतिक क्षेत्रात महिलांचा समभागात प्रतिनिधित्व सोबतच आरोग्य, पोषण आणि शिक्षण, उत्पादक संपत्ति, आर्थिक सेवा, रोजगार, प्रगती व सन्मान, सुरक्षा व सुनिश्चितता, कामाच्या ठिकाणी मूलभूत गरजासह मैत्रीपूर्ण वातावरण अपेक्षित आहे. महिला सक्षमीकरणासाठी वंचित घटकातील अनु.जाती जमाती, विमुक्त भटक्या जमाती, एकल महिला, बेघर, भूमिहीन, अपंग, ज्येष्ठ वयोवृद्ध, विस्थापित, प्रकल्पग्रस्त, लैंगिक व्यावसायिक कामगार, हिंसाचारग्रस्त, स्थलांतरित, मजूर (शेत मजूर, विटभट्टी, कोळसा खाण, दगड खाण, भाजी विक्रेते इत्यादि) यांना “कुणालाही मागे न ठेवता” बरोबरीने करण्याचे योजिले आहे.
महिला व बाल विभाग तर्फे या धोरणाचा मसुदा https://www.wcdcommpune.com/ या वेबसाइट प्रसारित झाला आहे. महिला संघटना, सामाजिक संघटना, कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक, तदन्य इत्यादिननी आपले अभिप्राय/सुचना दिनांक 20.02.2022 पर्यन्त
mahilavikas2021@gmail.comया ईमेल वर पाठवू शकता.
या मसुद्यावर विचार करण्यासाठी महिला संघर्ष वाहिनी व भैय्याजी पांढरीपांडे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सोसल वर्क कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 17 फेब्रूवारी 2022 ला दुपारी 12 वाजता कार्यशाळा करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमात गूगल मीट द्वारेही सहभागी होता येईल.
स्थळ : भैय्याजी पांढरीपाण्डे नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सोशल वर्क कॉलेज, क्रीड़ाचौक, हनुमाननगर, नागपुर
दिनांक : 17 फेब्रूवारी 2022 रोजी (गुरुवार) दुपारी 12 वाजता
संपर्क :
ज्योती निचळ-8767412402; प्रा. रेखा पांगुळ-9325753154