नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाआधी माध्यमांशी संवाद साधला. आजचा दिवस भारतासाठी एक महत्त्वाचा आहे. राष्ट्रपती पहिल्यांदाच संयुक्त सभागृहाला संबोधित करणार आहेत. आजचा दिवस महिलांसाठी सन्मानाचा दिवस आहे. दुर्गम जंगलात राहणाऱ्या आपल्या देशातील महान आदिवासींचा हा सन्मान आहे.
आज राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू आपले पहिले भाषण संयुक्त सभागृहासमोर करत आहेत, हा केवळ संसद सदस्यांसाठीच नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. जेव्हा एखादा नवीन सदस्य पहिल्यांदा भाषण करत असतो. तेव्हा, सर्वजण त्यांचा उत्साह वाढवत असतो, आजही तेच पाहायला मिळेल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देखील एक महिला आहेत. त्या उद्या बजेट घेऊन येत आहे. या अर्थसंकल्पाकडे भारताचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. हा अर्थसंकल्प जगाच्या अर्थव्यवस्थेवरही प्रकाश टाकेल. मला आशा आहे की अर्थमंत्री सर्व अपेक्षा पूर्ण करतील.
आपला एकच विचार आहे, देश अगोदर, देशवासी अगोदर. अर्थसंकल्पीय अधिवेशनात वाद होतील आणि चर्चाही होईल. सभागृहात प्रत्येक मुद्द्यावर चांगली चर्चा होईल. या अधिवेशनात सर्व खासदार पूर्ण तयारीनिशी सहभागी होतील. हे सत्र आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज मंगळवारपासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. या अधिवेशनात मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारीला सादर करणार आहे. आजच आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार आहे.
- online casino india
- best online casino in india
- best online casino india
- online casino india real money
- online casino in india
- online casino games in india
- online casino games india
- online casino real money india
- best casino in india online
- online casino games for real money
- casino in india online
- casino games india
- best casino in india
- online casino game real money
- casino india online
- crazy time casino india
- casino online india
- online casino play for real money
- casino games in india
- best online live casino india