1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

अरेच्चा! समीर वानखेडेच्या नावे ‘बार’ही

Spread the love

उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात वाशीमधील ‘त्या’ रेस्ट्रॉ-बारचा उल्लेख

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधलाय.

“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केलाय. आज मलिक पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये ते याच बाबतीत अधिक खुलासे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

कुठे आहे हा बार?

समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा परवाना आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हा बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय.

शाळेच्या दाखल्यावरुन आरोप…

गुरुवारीच मलिक यांनी वानखेडेंच्या शाळा दाखल्यावर ते ‘मुस्लीम’ असल्याची नोंद असल्याचा दावा केलाय. वानखेडे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळविल्याच्या आरोपाचं समर्थन करण्यासाठी मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुस्लीम अशी नोंद असल्याची माहिती दिली. वानखेडे यांनी मुंबई पालिकेच्या दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

धर्माच्या रकान्यामध्ये मुस्लीम असा उल्लेख

वानखेडे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी आहेत. ते मुस्लीमधर्मीय असताना त्यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी गुरुवारी काही दस्तऐवज उघड केले. त्यात वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दोन दाखल्यांचा समावेश आहे. दोन्ही दाखल्यांवर ‘समीर दाऊद वानखेडे’ असे नाव असून, धर्माच्या रकान्यापुढे मुस्लीम अशी नोंद आहे.

Claim Free Bets

आधीच्या पत्नीच्या भावाला अडकवल्याचा आरोप

मुंबई पालिकेतील सर्व नोंदी आम्ही तपासल्या आहेत. महापालिकेच्या दस्तऐवजांमध्ये त्यांनी १९९३ मध्ये खाडाखोड केल्याचे निदर्शनास आले आहे. उच्च न्यायालयासमोर महापालिकेची मूळ कागदपत्रे आम्ही सादर करणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले. वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. ती आपल्याविरोधात कधीही उभी राहू शकते, या भीतीपोटी तिच्या चुलत भावाला अमली पदार्थ प्रकरणात फसवून अटक करण्यात आली. आमच्याविरोधात साक्ष दिली तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकू, अशी वानखेडे यांनी धमकी दिल्याचा आरोप मलिक यांनी केला.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    विधानसभेला आम्ही 170 जागा घेणारच; चंद्रकांत पाटील

    June 13th, 2022 | RAHUL PATIL

    Spread the loveमुंबई: राज्यात 2024 मध्ये होणारी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ही आम्ही एकट्याने लढणार आहोत. महाविकास आघाडीती...

    हिवाळी अधिवेशनात मोठ्या नेत्यांची नावं जाहीर करणार; ...

    October 29th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveराष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करतानाच काही...

    राज्यातील शिक्षकांच्या वेतनासाठी सीएमपी प्रणाली वापरा

    October 20th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveजिल्हा परिषद अर्थ विभागाच्या बैठकीत शिक्षक संघाची मागणी वेतन अनुदान मिळाल्यानंतर राज्यातील प्रत्येक पंचायत ...