नागपूर:राष्ट्रपती पदासाठी अपक्ष उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आज स्वतःचा अर्ज दाखल केला. या वेळेस काँग्रेस नेता राहूल गांधी देखील उपस्थित होते. तसेच काँग्रेस नेता मल्लिकार्जुन खडगे यांनी मीडिया शी बोलतांना सांगितले कि आम्हाला १७ पेक्षा जास्ती पक्षांचे समर्थन आहे, आणि ज्या लोकांना आम्ही संपर्क नाही केला त्यांनी खुद्द आमचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना फोन केला आणि त्यांच्याशी बोलणे केले.
याआधी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले होते कि, राष्ट्रपती निवडणुकीत आपले उमेदवार यशवंत सिन्हा यांचा विजय निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागणार आहेत. जर का कोणी राष्ट्रपती निवडणुकीतील अंकगणितांवर लक्ष दिले तर त्यांची स्थिती इतकी पण खराब नाही, जितकी सांगितल्या जात आहे, आणि विरोधी पक्षाला देखील चांगलीच टक्कर दिली जाऊ शकते.
मतदान हे १८ जुलै ला आणि मतगणना हि २१ जुलै होईल. उमेदवार २९ जून पर्यंत नामांकन भरू शकतात.अर्ज परत घेण्याची तारीख २ जुलै आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै ला संपेल.