उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत सातत्याने बुलडोझर विशेष चर्चेत राहिल्याचे दिसले. विरोधी पक्षाने सतत त्यावरून योगी आदित्यनाथ यांना धारेवर धरले होते आणि आज तोच बुलडोझर योगी आदित्यनाथ यांची ओळख बनला आहे. योगी यांच्या या जादूला त्यांच्या समर्थकांनी आणखी डोक्यावर गेतले असल्याचे चित्र उत्तर प्रदेशात दिसत आहे.
रविवारी या बाबतीत आणखी एक मजेशीर घटना घडली. बुलडोझर बाबा योगी आदित्यनाथ गोरक्षमठात येणार म्हटल्यावर त्यांचे समर्थक गीता वस्त्रचे मालक शंभू आणि संजय शहा या दोघा बंधूनी योगी यांना चक्क चांदीचा बुलडोझर भेट दिला. चार दिवसांच्या या काळात योगी जुन्या मूड मध्ये होते. खासदार असताना ते जसे येथील नागरिकांच्या गाठीभेटी घेत तसेच लोकांना भेटत होते, विविध चर्चा करत होते, माहिती घेत होते.
विशेष म्हणजे युपी मध्ये ऐतिहासिक विजय मिळविल्यावर योगी आदित्यनाथ यांना अनेकांनी खेळण्यातले बुलडोझर भेट म्हणून दिले आहेत. शेवटी खेळणी बाजारात बुलडोझरची कमतरता निर्माण झाली असे सांगितले जाते. यंदा होळी मध्ये बुलडोझर पिचकारी सुद्धा खूप खपली. बुलडोझरच्या भीतीने माफिया पळताहेत असे दिसून आले आहे. १० मार्च रोजी मतमोजणी सुरु झाली आणि काही वेळात भाजपचा विजय दिसू लागला तेव्हा गोरखपूर मध्ये योगी समर्थकांनी बुलडोझर रॅली काढली त्यात हजारो समर्थक सहभागी झाले होते. या काळात बुलडोझरला इतकी मागणी होती कि बुकिंग साठी वेटिंग लिस्ट तयार झाली होती असे सांगितले जाते.