1. US rules out bailout for Silicon Valley Bank, auctions reportedly underway 2. Apple CEO Tim Cook backs AR/VR headset, likely to launch this year 3. Infosys’ Mohit Joshi joins Tech Mahindra as MD and CEO गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींवर झालेले आरोप राजकीय सुडातून : अमित शाह शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत 7 ते 11 वयोगटातील मुलांचं लवकरच लसीकरण, कोवोवॅक्सच्या आपात्कालीन वापरासाठी शिफारस

जिल्हा परिषदेची शासनाकडे ४७५ कोटींची थकबाकी

zilla parishad
Spread the love

जिल्ह्यात ग्रामीण भागात विविध विकासकामे करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध व्हावा म्हणून अनेक वर्षांपासून राज्य शासनाकडे जिल्हा परिषदेचे मुद्रांक शुल्कांचे तब्बल ४७५ कोटी रुपयांची थकबाकी त्वरित द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे यांनी बुधवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन केली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा निधी उपलब्ध झाल्यास कोरोनामुळे रखडलेली अनेक विकासकामे मार्गी लावता येतील, असे देखील पानसरे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या एकूण उत्पन्नापैकी मुद्रांक शुल्काचा निधी हा मुख्य स्रोत आहे. परंतु गेल्या सात-आठ वर्षांपासून अपुरा मिळत आहे. गेल्या पाच वर्षांचा तसेच यंदाचा निधी असा जवळपास ४७५ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनाकडे थकीत आहे. पुणे जिल्ह्याचा विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता ग्रामीण भागात विकासकामांसाठी निधी कमी पडतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून कोरोनामुळे विकास निधीला मोठा कट लागला आहे. याचा परिणाम विकासकामांवर झाला असून, अनेक महत्त्वाची कामे निधीअभावी रखडली आहेत.

Claim Free Bets

जिल्ह्यातील विविध खरेदी विक्रीच्या स्टँप ड्यूटीतून जिल्हा परिषदेला शासनाकडून मुद्रांक शुल्क निधी मिळत असतो. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन १९६१ च्या कलम १५८अन्वये हा निधी दिला जातो. जिल्हा परिषदेचा उत्पन्नाचा हाच मुख्य स्रोत असतो. या निधीवरच जिल्ह्याचा विकास अवलंबून असतो. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून अपुरा निधी मिळत आहे.

    Avatar

    RAHUL PATIL

    All Posts

    Latest News

    Related Post

    View All

    भारतात घुसणा-या पाकिस्तानी बोटीसह 12 जण अटकेत

    September 16th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveभारतीय तटरक्षक दलाने गुजरातमध्ये भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटीला पकडलं आहे. तसेच, या बोटीवर असलेल...

    राजस्थान सरकारने मागे घेतले वादग्रस्त बालविवाह नोंदण...

    October 12th, 2021 | RAHUL PATIL

    Spread the loveबालविवाहांसह लग्नांच्या अनिवार्य नोंदणीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक राजस्थान सरकारने गेल्या म...

    कोरोना लस घेण्यासाठी कोणावरही बळजबरी करता येणार नाही...

    May 3rd, 2022 | RENUKA KINHEKAR

    Spread the loveनवी दिल्ली- देशातील कोरोना लसीकरणावर सर्वोच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. कोरोनाची लस घेण्यासाठी कोण...